कर्नाटकात दडपशाही सुरू! फेसबूक पोस्टमुळे शिक्षकाची हकालपट्टी!

22 May 2023 16:07:10
karnataka-school-teacher-suspended-minutes-after-sharing-post-criticising-siddaramaiah-govt

नवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नुकतीच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.त्यानंतर चक्क एका शिक्षकांने फेसबूक पोस्ट केली म्हणून सिद्धरामय्या यांनी त्या शिक्षकाला निलंबित केले आहे. चित्रदुर्ग जिल्ह्यातील होसादुर्ग तालुक्यातील शिक्षक शांतमूर्ती एमजी यांनी फेसबुकवर सिद्धरामय्या यांच्यावर टिप्पणी केली. यानंतर शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

22 May, 2023 | 16:9

सरकारी प्राथमिक शाळेत शिकवणाऱ्या शांतामूर्ती यांनी सिद्धरामय्या यांच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यामुळेच ही कारवाई सिद्धरामय्या यांच्याकडून करण्यात आली. शांतामूर्ती यांनी लिहले होते की,सिद्धरामय्या यांच्या सरकारमध्ये राज्याचे कर्ज नेहमीच वाढते. याबाबत शांतामूर्ती यांनी अनेक मुख्यमंत्र्यांशी संबंधित माहितीही शेअर केली.त्यानंतर काही वेळात शांतामूर्ती यांना निलंबनाला समोरे जावे लागले आहे. त्यामुळे सत्ता येताच दडपशाही सुरू झाल्याचं चित्र कर्नाटकात दिसत आहे.


Powered By Sangraha 9.0