मंत्रीमंडळ विस्तार होणार; उदय सामंतांनी दिले संकेत!

    22-May-2023
Total Views |
Uday Samant on Cabinet Expansion

रायगड : राज्याच्या राजकारणातल्या नाट्यमय घडामोडींनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सरकारचं दुसऱ्या टप्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे संकेत मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. सामंत म्हणाले की, भरत गोगावले हे आमदार म्हणून खरच भाग्यवान आहेत.कारण त्यांच्या मतदारसंघात रायगड जिल्हा येतो.त्यामुळे मी तात्पुरता भाग्यवान असून लवकरच भरत गोगावले पालकमंत्री होतील.

सामंत हे रायगड येथे बोलत होते. यावेळी त्यांनी आपण रायगड जिल्ह्याचे तात्पुरते पालकमंत्री आहोत असे सांगत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. यावेळी सामंत यांनी भरत गोगावले हे विधानसभेचे आमदार आहेत ते भाग्यवान आहेत कारण रायगड हा त्यांच्या मतदारसंघात येतो. त्यामुळे ते रायगडचे पुढचे पालकमंत्री असतील, असे ही ते म्हणाले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.