शाहरुखच्या मुलाचे हाल झाले तशी अवस्था आपल्या मुलांचाही होईल : सुप्रिया सुळे

    22-May-2023
Total Views |
 
Supriya Sule
 
मुंबई : शाहरुखच्या मुलाचे हाल झाले तशी अवस्था आपल्या मुलांचाही होईल. माझी केंद्र सरकारला विनंती आहे की कुणाच्या घरात घुसून मुलांवर अन्याय करू नका. राजकारण इतकं गलिच्छ होऊ नये. असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणी एनसीबीचे तत्कालीन प्रमुख समीर वानखेडे यांची मागील दोन दिवसांपासून सीबीआय चौकशी सुरु आहे. या प्रकरणी आता सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
 
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "समीर वानखेडे यांच्याबाबत नवाब मलिक जे बोलत होते ते आता खरं व्हायला लागलं आहे. शाहरुख हा मोठा अभिनेता आहे. त्याच्या मुलाबाबत असं होत असेल तर सामान्यांच्या मुलांचं काय हाल होत असतील? त्यामुळे समीर वानखेडे यांचा मुद्दा मी संसदेत मांडणार. लोकांच्या घरामध्ये घुसून बायका-पोरांवर असा अन्याय करणं चुकीचं आहे." त्यामुळे या प्रकरणी सभागृहात आवाज उठवणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.