पुस्तकात ठाकरेंबाबत लिहिलं ते दोषारोप करण्यासाठी नाही : शरद पवार

22 May 2023 18:34:44
 
Sharad pawar
 
 
 
मुंबई : 'लोक माझे सांगाती' या पुस्तकात ठाकरेंबाबत लिहिलं ते दोषारोप करण्यासाठी नाही. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. यंत्रणांचा गैरवापर कसा राज्यात होतोय हे दिसतयं. अत्तापर्यंत राष्ट्रवादीच्या १० नेत्यांची चौकशी झाली. अनिल देशमुखांवर अतिरंजित आरोप झाले. देशमुखांच्या चौकशीतुन काहीही निष्पन्न झाले नाही. अनिल देशमुखांना नाहक तुरुंगवाल झाला. असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. जयंत पाटलांच्या ईडी चौकशीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
पुढे नोटबंदीवर बोलताना ते म्हणाले, "नोटबंदीमुळे देशात अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. नोटबंदीमुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेत. नोटबंदीबाबत लहरी निर्णय घेतले जातात. भारत जोडोचा परिणाम कर्नाटकात दिसला. सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. जागावाटपाबाबत अद्याप चर्चा नाही. कर्नाटकच्या निकालामुळे निवडणुका लांब जाऊ शकतात. लोकसभेसाठी जागावाटपाचा निर्णय तिन्ही पक्षाचे प्रमुख घेतील." असं शरद पवार म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0