अतीक अहमदसारखी घटना माझ्यासोबतही घडू शकते: समीर वानखेडे
22-May-2023
Total Views |
मुंबई : अतीक अहमदसारखी घटना माझ्यासोबतही घडू शकते. मला आणि माझ्या पत्नीला गेल्या चार दिवसांपासून धमक्या मिळत असल्याची तक्रार वानखेडेंनी केली आहे. “मी मुंबई पोलीस आयुक्तांना याविषयी पत्र लिहिणार आहे आणि विशेष सुरक्षेची मागणी करणार आहे” असंही त्यांनी स्पष्ट केलं. क्रांतीने याआधी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली होती. “त्यांच्याविरोधातील सर्व आरोप खोटे आहेत, हे प्रत्येकाला माहित आहे. हे फक्त आरोप आहेत आणि आम्ही सीबीआयच्या चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करत आहोत. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही चौकशीला पूर्णपणे सहकार्य करतोय” असं क्रांती म्हणाली होती.
समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरू आहे. 20 मे रोजी पाच तास चौकशी करण्यात आली. तर रविवार, 21 मे रोजी देखील पाच तास चौकशी करण्यात आली. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात 25 कोटींची खंडणी मगितल्याचा त्यांच्यावर आरोप असल्याने त्याची चौकशी करण्यात येत आहे. तर आता समीर वानखेडे यांनी माझ्यावर हल्ला होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली आहे.
दरम्यान, तुमच्यावर जे काही आरोप होत आहेत यामुळे हल्ल्याची भीती आहे का? असा प्रश्न विचारला तेव्हा समीर वानखेडे यांनी सांगितलं की, सोशल मीडिया, इन्स्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडियावरुन सतत धमक्या येत आहेत. या सर्व विषयांवर मी मुंबई पोलीस आयुक्तांशी लवकरच चर्चा करणार आहे. मला ही सुरक्षा द्या अन्यथा माझ्यावर अतिक अहमदप्रमाणे हल्ला करू शकतात. अशी भीती समीर वानखेडे यांनी व्यक्त केली आहे.