२० रुपयांत २ लाखांपर्यंतचा इन्शूरन्स मिळणार!

22 May 2023 20:03:54
Pradhan Mantri Suraksha Bima Yojana

नवी दिल्ली
: ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ सामान्य नागरिकांना देण्यात येत आहेत. या योजनांची माहिती सामान्यांना व्हावी व लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतील हे या लेखाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही देशातील नागरिकांसाठी एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी एक अपघात विमा योजना आहे. या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा. या योजनेत सहभागींना केवळ २० रुपयांमध्ये १ लाख ते २ लाखापर्यंतची भरपाई मिळणार आहे.

योजनेची वैशिष्ट्ये व अटी पुढीलप्रमाणे आहेत.

  • एका वर्षाचे विमा संरक्षण असणारी ही एक अपघात विमा योजना आहे.
  • दरवर्षी नूतनीकरण आवश्यक.
  • १८ ते ७० वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील.
  • ऑटो डेबिट सुविधा उपलब्ध.
  • योजनेचाकालावधी दर वर्षी १ जून ते ३१ मे असा राहील.
  • विमा हप्ता रु. २0/- प्रती वर्षराहील.
  • विमा धारकाने वय वर्ष ७0 पूर्ण केल्यावर / बँकेच्या बचत खात्यात विमा हप्ता नावे टाकण्यास पुरेशी रक्कम शिल्लक नसेल तर /बँक बंद केले तर विमा संरक्षण संपुष्ठात येईल.
  • एकाचव्यक्तीची अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एकाच बचत खात्याद्वारे हा विमा उतरवू शकेल.
  • विमा उतरविणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक पायाभूतमानला जाईल.
  • तांत्रिक अडचणीमुळे संपुष्ठात आलेली विमा पॉलिसी काही अटींची पूर्तता केल्यावर पुन्हा चालू करता येईल.
अशी असेल नुकसानभरपाई
  • मृत्यू - रु. २ लाख
  • दोन्ही डोळ्याची संपूर्ण आणि बरी न होणारी हानी/ दोन्ही हात किवा दोन्ही पाय निकामी होणे/एक डोळा आणि एक हात किवा पाय निकामी होणे. रु. २ लाख
  • एका डोळ्याची संपूर्ण आणि बरी न होणारी हानी किवा एक पाय निकामी होणे रु. १ लाख

या योजनेसाठी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँका, सर्व खाजगी बँका व ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यापैकी कोणत्याही बँकेत आपले बचत खाते असल्यास या योजनेचा लाभ घेता येईल. जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर या योजनेचा लाभ देण्यासाठी ३0 जूनपर्यंत मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी ग्रामपंचायत स्तरावरील या विशेष शिबिराला भेट देऊन योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0