पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी केला चरणस्पर्श

    22-May-2023
Total Views |
 Papua New Guinea pm James Marape

नवी दिल्ली
: जपानमधील ‘जी ७’ परिषदेत अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हिंद पॅसिफिक महासागरातील पापुआ न्यू गिनी या देशात आगमन झाले. या देशाचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पापुआ न्यू गिनी येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले. पंतप्रधान मोदी यांनी त्यांना मिठी मारून शुभेच्छा स्वीकारल्या. जेम्स मारापे यांनी नरेंद्र मोदी यांच्या चक्क पाया पडल्या. हा व्हिडिओ जगभरात चांगलाच ‘व्हायरल’ झाला आहे.पंतप्रधानांचा हा दौरा खूप महत्त्वचा आहे. कारण, पापुआ न्यू गिनी हा हिंद प्रशांत महासागरात स्थित एक बेट आहे आणि त्याच्या स्थानामुळे हिंद पॅसिफिक महासागराच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा दौरा खूप महत्त्वाचा मानला जात आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.