.. म्हणून न्यू गिनीचे पंतप्रधान मोदींसमोर नतमस्तक झाले

22 May 2023 11:49:18
Papua New Guinea PM James Marape touches PM Modi's feet


पूर्वेकडील एका टोकाला असणारा छोटासा देश, 'पापुआ न्यू गिनी' गाढ झोपेत असताना, तिथल्या एका फोटोने संपूर्ण भारतात प्रचंड खळबळ उडाली.भारत-पॅसिफिक द्वीपसमूह सहकार्य मंच (FIPIC) च्या तिसऱ्या सत्रासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि. २१ मे रोजी संध्याकाळी पोर्ट मोरेस्बी, पापुआ न्यू गिनी येथे गेले होते. जपान सोडून पापुआ न्यू गिनीला पोहचण्याची मोदींची ती वेळ म्हणजे सूर्यास्तानंतरची होती. मुळात पापुआ न्यू गिनीच्या अधिकृत प्रोटोकॉलनुसार, रात्री, सूर्यास्तानंतर कोणतेही अधिकृत स्वागत केले जात नाही. मात्र हे सगळे प्रोटोकॉल बाजूला ठेवून पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधान जेम्स मरापे यांनी मोदीजींचे भव्य आणि शाही थाटात स्वागत करत विमानतळावर सर्वांसमोर मोदीजींच्या चरणांना स्पर्श केला..!

ही गोष्ट तसे पाहयला गेले तर आश्चर्यकारक आहे कारण जगाच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही राष्ट्रप्रमुखाने सार्वजनिक ठिकाणी दुसऱ्या राष्ट्रप्रमुखाच्या चरणांची स्पर्श केलेला नाही. पापुआ न्यू गिनी (PNG) हा एक छोटासा देश आहे ज्याची लोकसंख्या फक्त १० दशलक्ष आहे असे म्हणायला हरकत नाही. जागतिक राजकारणात पीएनजीला फार मोठे स्थानही नाही.

मात्र, फरक हा आहे की जागतिक राजकारणात मोदींची प्रतिमा कमालीची उंचावलेली आहे. जेव्हा मोदीजी कोरोनाच्या काळात जगातील अनेक लहान-मोठ्या देशांमध्ये लस पाठवत होते, तेव्हा तेथील बुद्धिजीवी त्यांची खिल्ली उडवत होते. मात्र आज मोदीजींच्या कामाची दखल सर्वत्र घेतली जात आहे.

कोरोना महामारीत पापुआ न्यू गिनी संकटात असताना त्यांच्या शेजारील देश चीनने पाठ फिरवली. मात्र भारताने या देशाच्या लसीची गरज पूर्ण केली होती. ७ एप्रिल २०२१ रोजी भारताने पापुआ न्यू गिनीला लाखो लसी पाठवल्या होत्या. जेम्स मॅरापे यांना हे सर्व आठवले. आणि त्यामुळेच मोदीजींच्या चरणांना स्पर्श करणे हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न जेम्स मॅरापे यांनी केला.
 
एके काळी, हजार-दीड हजार वर्षांपूर्वी पुरुषपूर (आजचे पेशावर) ते पापुआ न्यू गिनीपर्यंत हिंदू संस्कृतीचे साम्राज्य होते. त्यामुळे आज मोदींच्या चरणांना स्पर्श करून आपल्या प्राचीन संस्कृतीचे धागे जेम्स मॅरापे यांच्याकडून पुन्हा दृढ केले गेले. या कार्यक्रमाच्या काही तास आधी, जपानमध्ये क्वाड समिटच्या समारोपाच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन मोदीजींना म्हणाले, "तुम्ही कमालीचे लोकप्रिय आहात. अमेरिकेत तुमच्या कार्यक्रमाला अनेक मोठ्या व्यक्ती आल्या आहेत. तिकिटांची व्यवस्था करण्यासाठी मारामार होत आहे. " त्यामुळे हे सगळ पाहिलं की असं वाटत , बदलत्या भारताचे हे अतिशय आश्वासक चित्र आहे..!

 
- प्रशांत पोळ


Powered By Sangraha 9.0