संजय राऊत, सर्वात मोठा जादूटोणा करणारा तर तुझा मालक!

-आ. नितेश राणेंचा टोला

    22-May-2023
Total Views |
 
raut and thackeray
 
 
मुंबई : संजय राऊत सर्वात मोठा जादूटोणा करणारा तुझा मालक आहे. काळी जादू करून ठाकरेंनी काय काय केलं हे आम्हाला माहीत आहे. मातोश्रीच्या मागील भागात जेसीबीने खोदून लिंब का टाकलेली याची माहिती द्यावी का? असं आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे. तसंच उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. संजय राऊत सर्वात मोठा जादूटोणा नकरणारा तुझा मालक उद्धव ठाकरे आहे, असं नितेश राणे म्हणालेत.
 
"उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांचे रक्त भगवे आहे का हे पाहावं लागेल. अजित पवार यांची डीएनए टेस्ट करण्याची हिंमत संजय राऊत बोलून गेला आहे. पाकिस्तानच्या प्रेमात असलेल्या संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या टोळीला आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला मान कधी हजम होणार नाही." असंही ते म्हणालेत.
 
"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनणार नाहीत. तर त्यांची पत्नी मुख्यमंत्री बनू शकतात, असं एका बुवाने सांगितलं होतं. म्हणून त्यांनी रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली होती. कर्जतच्या फार्महाऊसवर किती नर बळी दिले गेले याची माहिती घ्या. नव्या संसंद भवनाच्या उद्घाटनावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. त्यावर संसद भवनाचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनीच केलं पाहिजे. उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या वडिलांचे स्मारक उभं करू शकला नाही पण मातोश्री 2 उभं केलं." असं नितेश राणे म्हणाले.