ऑस्ट्रेलियात मराठमोळ्या पद्धतीत मोदींचं स्वागत!

22 May 2023 17:21:14
Australia

नवी दिल्ली
: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ऑस्ट्रेलियात अमेरिकेसारखेच जंगी स्वागत होणार आहे. जपानमध्ये पार पडलेल्या G-7 शिखर परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गेले आहेत. दरम्यान तेथील भारतीय रहिवाशांनी मोंदींच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली आहे. मोंदीच्या नावाच्या जयघोषात तेथील भारतीयांनी स्वागत करायचे ठरवले आहे. याआधी २०१४ मध्ये मोदींनी ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. आणि आता चक्क ९ वर्षांनी पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियात जात आहेत . त्यामुळे तिथे नागरिकांमध्ये उत्साह आहे. मराठमोळ्या पद्धतीचा पेहराव करून ऑस्ट्रेलियातील भारतीय नागरिक स्वागतासाठी तयार आहेत.



दरम्यान तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियातील सिडनीला भेट देणार आहेत. सिडनीच्या ऑलिम्पिक पार्कमध्ये मोदींच्या स्वागताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात १५ हजारांपेक्षा जास्त लोक सहभागी होतील. तेथील भारतीय समुदायाने या कार्यक्रमाला २७ हजारांपेक्षा अधिक लोकांची उपस्थिती राहण्याची शक्यता वर्तवली आहे.तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियातील सिडनीला भेट देणार आहेत.

  दरम्यान पंतप्रधान मोदींनी जागतिक पातळीवर केलेल्या नेतृत्वाची दखल घेत फिजीच्या पंतप्रधानांच्या घेतली. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजीचा सर्वोच्च सन्मान 'कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी' ने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा फिजीचा सर्वोच्च सन्मान आजपर्यंत केवळ मोजक्याच गैर-फिजी लोकांकडे आहे.


Powered By Sangraha 9.0