राऊतांना शिवसेना संपवण्यासाठी सिल्वर ओकवरुन पगार!

    22-May-2023
Total Views |
 
Jyoti Waghmare
 
 
मुंबई : खासदार संजय राऊतांना शिवसेना संपवण्यासाठी सिल्वर ओकवरुन पगार येतोय का? असा सवाल शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी नोटबंदीच्या निर्णयावर राऊतांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर केला आहे. त्या म्हणाल्या, "राऊत साहेब शिवसेना संपवण्यासाठीचा जो तुमचा पगार आहे तो सिल्वर ओकच्या काकांकडून दोन-दोन हजाराच्या नोटांमध्ये तुमच्याकडे येतोय का? असा संतप्त सवाल ही त्यांनी यावेळी केला आहे.
 
पुढे त्या म्हणाल्या, "राऊतांच्या घरातील कपाटे कदाचित दोन हजाराच्या नोटांनी भरलेली असतील त्याच्यामुळेच त्यांना या नोटबंदीची भीती वाटत आहे. नोटबंदी जर फसली असती तर आज देशाची अर्थव्यवस्था एवढी मजबूत झाली नसती. आज जगामधल्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्था ह्या अक्षरशः कोसळायला आल्यात. परंतु भारताची अर्थव्यवस्थेनं दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावरती झेप घेतलेली आहे. याचं संपूर्ण श्रेय हे देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांना जातं."
 
"कौरवांचा जन्म हा शंभर माठांमधून झाला होता. एकशे एकाव्या माठामधून संजय राऊतांचा जन्म झालाय. ते माठ आहेत. त्याच्यामुळे ते काय बोलतात याच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही आहे. दोन हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्या याची भीती त्यांनाच वाटायला पाहिजे, ज्याच्याकडे नोटा भरपूर आहेत." असा इशारा ज्योती वाघमारे यांनी दिला.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.