शूटिंगदरम्यान अनुपम खेर यांना दुखापत!

22 May 2023 12:54:02
Anupam Kher

मुंबई
: बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर शूटिंगदरम्यान जखमी झाले आहेत. ही माहिती त्याने स्वत: त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांना दिली आहे. 'विजय ६९' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनुपम खेर यांचा हा अपघात झाला आहे. या अपघातादरम्यान त्याच्या खांद्यावर गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे खांद्याच्या दुखापतीमुळे त्यांना खूप वेदना होत आहेत. तसेच त्यांनी एक- दोन दिवसांनी पुन्हा शुटिंगला सुरूवात करणार असल्याचे खेर यांनी सांगितले आहे. सोबत त्यांनी सोशलमिडीयावर आपला फोटो शेअर केला आहे. यात त्यांच्या हाताला पट्टी बांधल्याचे दिसत आहे.


Powered By Sangraha 9.0