'द केरला स्टोरी' प्रदर्शित केला म्हणून पश्चिम बंगालमध्ये थिएटर मालकांना धमक्या!

    21-May-2023
Total Views |
theatre-owners-threatened-due-to-the-kerala-story
 
नवी दिल्ली : 'द केरला स्टोरी' या चित्रपटाचे निर्माते विपूल शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये थिएटर मालकांना धमक्या मिळत असल्याचे म्हटले आहे. तिकिट विक्रिच्या खिडक्या उघडल्या तर तुमचे थिएटर सुरक्षित राहणार नाही,अशा धमक्या थिएटर मालकांना फोनवरून मिळत आहेत. पोलीसांकडून हे फोन केले जात आहेत, असे शाह यांनी म्हटले आहे. दरम्यान ,पश्चिम बंगाल सरकारने केरला स्टोरीवर बंदी घातली होती.सर्वेाच्च न्यायालयाने ती बंदी हटवली.

सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील ‘द केरळ स्टोरी’वरील बंदी उठवल्यानंतरही चित्रपटगृहांमध्ये सिनेमा प्रदर्शित करण्यात आलेला नाही. कोलकात्यामध्ये स्थानिक प्रशासन चित्रपटगृह मालकांना धमकावत आहे. स्क्रीनिंग केल्यास ‘दंडात्मक कारवाई’ करण्याची धमकी चित्रपटगृह मालकांना देण्यात येत असल्याचा दावा भाजपचे आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.