' द केरला स्टोरी' ची १७५ कोटींची कमाई; अदा म्हणाली, ‘मेरी कहानी दुसरों के लिए उम्मीद…’

    21-May-2023
Total Views |
the-kerala-story-earns-175-crore-adah-sharma-shares-a-post-on-instagram

नवी दिल्ली : अदा शर्मा अभिनित ' द केरला स्टोरी' या चित्रपटाने रिलीजनंतर दोन आठवड्यात १७५ कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा टप्पा पार केल्याबद्दल संपूर्ण टीम आनंदी आहे. लवकरच हा चित्रपट २०० कोटींची कमाई करणार असल्याची शक्यता आहे. भारताशिवाय जगातील सुमारे ४० देशांमध्ये हा चित्रपट पाहायला मिळत आहे.

चित्रपटाने १७५ कोटींची कमाई केल्याबद्दल अदा शर्माने आनंद व्यक्त केला आहे. तिने समाजमाध्यमावर लिहले की, "प्रेक्षकांचे तसेच संपुर्ण द केरला स्टोरीच्या टीमचे मी अभिनंदन करते.त्यामुळे केरला स्टोरीचे यश यश तुम्हा सर्वांचे आहे."हा चित्रपट यूकेमध्ये प्रदर्शित झाला आहे. लवकरच बंगालमधील चित्रपटगृहांमध्येही हा चित्रपट प्रदर्शित होईल, अशी अभिनेत्रीला आशा आहे.अदा शर्माने तिच्या पोस्टमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. पहिला फोटो चित्रपटाच्या पोस्टरचा आहे. आणि दुसरे पोस्टर अदा शर्माच्या घरातील आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.