मला मतदान करत नाही तर माझ्याकडे का येता? ; राज ठाकरेंचा शेतकऱ्यांना सवाल

21 May 2023 17:23:23
raj thackeray on nashik tour

मुंबई
: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका यानिमित्ताने ठाकरे घेत आहेत. त्यातच दि. २१ मे रोजी नाशिक दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या. या भेटीनंतर राज ठाकरेंनी शेतकऱ्यांसमोर आपली खंत व्यक्त केली. "तुम्ही मला मतदान करत नाही, मग माझ्याकडे का येता?", असा प्रश्न राज ठाकरेंनी यावेळी शेतकऱ्यांना विचारला. ज्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू असे आश्वासन दिलं होतं, त्यांनाच तुम्ही मतदान करता ना, त्याचबरोबर जे तुमची पिळवणूक करता, त्यांनाच तुम्ही मतदान करता, याचं भान तुम्ही ठेवायला हवं, असं आवाहन राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना केलं.

राज ठाकरे पुढे म्हणाले, “मध्यंतरी शेतकऱ्यांनी संप केला होता. तेव्हा काही शेतकरी बांधव मला भेटायला आले होते. मी त्यांना सांगितलं, अडचणींच्या काळात माझ्याकडे येता आणि मतदानाच्या वेळी मतदान त्यांना करता. त्यावेळी मला शेतकरी बांधव म्हणाले साहेब अडचण वेगळी आणि मतदान वेगळं. जे तुम्हाला मदत करत नाही त्यांना तुम्ही मतदान करत आलात तर अडचणींच्या काळात तुम्ही माझ्याकडे का येता? ज्यांनी सांगितलं होतं की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करतो त्यांना तुम्ही मतदान केलंत की नाही? आपण काय करतो आहोत त्याचं भान ठेवा.” असे राज ठाकरे म्हणाले.




Powered By Sangraha 9.0