EI सल्वाडोरमध्ये चेंगराचेंगरीत ९ जणांचा मृत्यू

    21-May-2023
Total Views |
nine-killed-in-tampede-at-occer-tadium-in-el-salvadorphototwitter

नवी दिल्ली
: EI सल्वाडोर या देशात झालेल्या चेंगराचेंगरीत ९ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत. फुटबॅाल मैदानात ही घटना घडली आहे. सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक मैदानात प्रवेश करत असताना चेंगराचेंगरी झाली आहे. रेस्कयू टीम मैदानात तातडीने पाठविण्यासाठी आली होती. तसेच जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती EI सल्वाडोर आरोग्यमंत्र्यानी दिली आहे.

सल्वाडोर येथील स्थानिक संघ अलियान्झा आणि सांता आना-आधारित संघ फास यांच्यातील सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते. मोन्युमेंटल स्टेडियमचे गेट बंद असतानाही त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान चेंगराचेंगरीत सात पुरुष आणि १८ वर्षांवरील दोन महिलांचा मृत्यू झाला.स्थानिक माध्यमांनी शेअर केलेल्या फुटेजमध्ये, फुटबॉल चाहते स्टेडियमच्या प्रवेशद्वारावरील बॅरिकेड्स ओढण्याचा प्रयत्न करताना दिसतात.EI सल्वाडोरचे आरोग्य मंत्री फ्रान्सिस्को अल्बी यांनी सांगितले की, जवळच्या रुग्णालयातील रुग्णवाहिका जखमींना रुग्णालयात पोहोचवत आहेत.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.