‘पीएम मोदी ऑटोग्राफ प्लीज’ ; मोदींच्या लोकप्रियतेची बायडेन यांना भूरळ

21 May 2023 21:49:52
joe biden on pm narendra modi popularity

हिरोशिमा
: ‘’तुम्ही अमेरिकन लोकांवरही प्रभाव टाकला आहे. तुमची अमेरिकेत प्रचंड लोकप्रियता आहे. तुम्ही प्लीज मला तुमचा ऑटोग्राफ द्या,” हे उद्गार आहेत जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे. हिरोशिमामधील या घटनेची सध्या जागतिक पातळीवर चर्चा होताना दिसत आहे. जपानमध्ये ‘जी-७’ परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांची भेट झाली. त्यात बायडेन यांनी मोदी यांच्यावर स्तुतिसुमने वाहिली.

दरम्यान, आजघडीला पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. त्याची लोकप्रियता ७८ टक्के इतकी आहे. त्यांची ही लोकप्रियता पाहूनच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना त्यांची भूरळ पडली असून ते भलतेच खूश आहेत. हिरोशिमात क्वाड संमेलन तसेच ‘जी-७’ शिखर परिषदेनिमित्त अनेक देशांचे नेते एकत्र आले आहेत. त्यात पंतप्रधान मोदी विविध नेत्यांना भेटत आहेत.

जो बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. जो बायडन मोदींच्याजवळ आले आणि म्हणाले की, “मी सध्या एका वेगळ्याच परिस्थितीचा सामना करतोय. तुमची लोकप्रियता अफाट आहे. ही माझ्यासाठी एक समस्या बनली आहे. तसेच, पुढच्या महिन्यात मी वॉशिंग्टनमध्ये तुमच्यासाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं आहे. त्यासाठी अमेरिकेच्या प्रत्येक शहरातून-गावातून येऊ इच्छित आहे. पण आता त्यासाठीचे माझ्याकडचे पासेस संपले आहेत. तुम्हाला वाटत असेल की मी तुमची चेष्टा करतोय. पण हवं तर माझ्या टीमला विचारा, मला अशाही लोकांचे फोन येत आहेत, ज्याचं याआधी मी नावही ऐकलेलं नाहीये. कलाकारांपासून ते माझ्या नातेवाईकांपर्यंत लोकांचे मला फोन येत आहेत. त्यांना या पार्टीत यायचं आहे,” असेही बायडन यांनी पंतप्रधान मोदी यांना म्हणाले.
पीएम मोदी तुमची लोकप्रियता अफाट आहे. ही माझ्यासाठी एक समस्या बनली आहे. तुमच्या स्वागतासाठी अमेरिका सज्ज आहे. तुम्हाला भेटण्यासाठी कलाकारांपासून माझ्या नातेवाईकांपर्यंत लोकांचे मला फोन येत आहेत.
जो बायडेन, राष्ट्राध्यक्ष-अमेरिका
Powered By Sangraha 9.0