२७ मे रोजी बीसीसीआयच्या बैठकीत वर्ल्डकपचं वेळापत्रक ठरणार?

    21-May-2023
Total Views |
cricket World Cup 2023 bcci meeting

मुंबई
: यंदाच्या वर्ल्डकपचे यजमानपद भारत भूषविणार आहे. बीसीसीआयकडून त्यासंदर्भात तयारी सुरू आहे. २७ मे रोजी होणाऱ्या बैठकीत वेळापत्रकावर चर्चा होणार आहे. त्यानंतर सामन्यांच्या वेळापत्रकावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने अहमदाबादमध्ये बोलावलेल्या बैठकीत मोठी घोषणा होणार आहे. दरम्यान, ५ ऑक्टेबर ते १९ नोव्हेंबर यामध्ये वर्ल्डकपचे आयोजन करण्यात आले आहे. सामन्यांचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आले नसून त्याबाबतही लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. १२ शहरांमध्ये या विश्वचषकाचे आयोजन होईल. तसेच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, एकदिवसीय विश्वचषक २०२३ या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे. या स्पर्धेच्या तारखा अद्याप आलेल्या नाहीत. याबाबत बीसीसीआयकडून एक मोठे अपडेट समोर आले आहे. त्यानुसार, विश्वचषक २०२३ चे संपूर्ण वेळापत्रक एका विशिष्ट तारखेला जाहीर केले जाऊ शकते. शुक्रवार, १९ मे रोजी उघड झालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण बैठक अहमदाबादमध्ये २७ मे रोजी होणार आहे. ही तारीख २८ मे रोजी होणाऱ्या आयपीएल २०२३ च्या अंतिम सामन्याच्या एक दिवस आधी आहे. या दिवशी आयपीएलचा एकही सामना खेळला जाणार नाही.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.