संजय राऊत मद्यपान करूनच बोलतात : नितेश राणे

21 May 2023 15:04:38
Nitesh Rane on Sanjay Raut

मुंबई
: महाप्रबोधन यात्रेचे वक्ते खासदार संजय राऊत हे मद्यपान करून सभेत बोलतात, अशी टीका नितेश राणेंनी राऊतांवर केली आहे.त्यामुळे शुद्धीत भाषण करू शकत नाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करू नये, असे ही राणे म्हणाले.

दरम्यान पंतप्रधानांना जागतिक स्तरावर मान आहे. पण राऊतांच्या मालकाला कलानगरमध्ये देखील कोणी ओळखत नाही. ठाकरे गटात सगळे एसी आणि सोफा गोळा करणारे आहेत. त्यामुळे जे लोक स्वतांच्या पैशाने परफ्यूम घेऊ शकत नाही त्यांनी पंतप्रधानांवर टीका करू नये , असा टोला ही राणेंनी राऊतांवर लगावला. तसेच उद्धव ठाकरे यांच्या कर्जत येथील फार्म हाऊसमध्ये भूमिगत पैशाचे गोदाम बांधले आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे ,असे ही राणे म्हणाले.
 

Powered By Sangraha 9.0