मुनगंटीवारांच्या प्रयत्नाने लोककलावंतांचे थकीत मानधनाचे वितरण

20 May 2023 16:08:25

mungantiwar 
 
मुंबई : पुणे येथे दि. २० मे रोजी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दौरा होता. यावेळी, संस्कार भारती पश्चिम प्रांताचे कार्याध्यक्ष आणि श्री शिवनेरी स्मारक समितीचे अध्यक्ष आचार्य शाहिर हेमंतराजे मावळे यांनी सुधीर यांची भेट घेतली व त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. गेली अडीच वर्षे लोककलावंतांचे मानधन थकीत होते. हे सरकार स्थापन झाल्युअनंतर त्यांचे मानधन वितरित करण्याचे प्रयत्न मुनगंटीवारांच्या प्रयत्नांतून झाले. व त्यासाठी हा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
 
याबाबत ट्विटरवर पोस्ट करत याविषयी माहिती सुधीर यांनी दिली आहे. ते म्हणाले, "गेली अडिच वर्षे लोककलावंतांचे थकित असलेले मानधन वितरित केल्याबद्दल आनंद व्यक्त करून त्यांनी यावेळी माझा सत्कार करून धन्यवाद पत्र दिले. शासन लोककलावंतांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, याची त्यांना यावेळी खात्री दिली."
 
दरम्यान यावेळी जेष्ठ पुरातत्व अभ्यासक गोरक्षनाथ बंदामहाराज देगलूरकर यांचीही भेट झाली. तसेच देगलुरकरांनी स्वलिखित पुस्तके मुनगंटीवारांना भेट म्हणून दिली. या भेटीबाबत सुधीर म्हणतात, "पुरातत्वविद, प्राचीन मंदिर स्थापत्याचे जाणकार अभ्यासक, ज्ञानतपस्वी प्रा.डॉ. गो.बं. देगलूरकर यांची काल पुणे दौऱ्यात भेट झाली. त्यांनी त्यांची "मंदिर कसे पाहावे" आणि "Temple Architecture and Sculpture of Maharashtra" ही पुस्तके भेट दिली. अशा ज्ञानतपस्व्याची भेट जीवन समृद्ध करणारी असते. मात्र काल दौऱ्याच्या धावपळीत फार वेळ गप्पा मारता आल्या नाहीत, तरी ही भेट आनंददायी होती हे निश्चित."
Powered By Sangraha 9.0