जास्त वजन असणाऱ्या पोलिसांना स्वेच्छानिव़ृत्ती मिळणार!

    20-May-2023
Total Views |
 
overweight police
 
 
मुंबई : जास्त वजन असणाऱ्या पोलिसांना स्वेच्छानिव़ृत्ती मिळणार असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी वजन जास्त असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस लाइनमध्ये बदली करण्याचा आदेश दिला. त्यानुसार जोपर्यंत पोलिस कर्मचारी फिट होत नाही, त्यांचे वजन कमी होत नाही, त्यांना व्यायाम करु द्या, असे आदेश देण्यात आले आहे.
 
दरम्यान आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनीही जास्त वजन असणाऱ्या पोलिसांना 3 महिन्यात वजन कमी न केल्यास स्वेच्छानिवृत्ती दिली जाईल, असे निर्देश दिलेत.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.