शबाना म्हणते , अभिषेकशी लग्न केलं म्हणून माझ्या वडीलांकडून आमच्या जीवाला धोका!

    20-May-2023
Total Views |
muzaffarpur-shabana-khatun-marries-abhishek-seeking-bihar-police-protection

नवी दिल्ली: बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील एका मुस्लिम मुलीने हिंदू मुलाशी लग्न केले आहे. मात्र लग्नानंतर मुलीने कट्टरपंथीयांकडून तिच्या आणि पतीच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे.तसेच यापुढेही पतीसोबत राहण्याची इच्छा मुलीने व्यक्त केली आहे. ४२ दिवसांपुर्वी ती घर सोडून प्रियकरासह पळून गेली होती. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्या पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
 
मुळात हे प्रकरण मुझफ्फरपूर जिल्ह्यातील अहियापूर पोलीस स्टेशन क्षेत्राशी संबंधित आहे. शाहबाजपूर येथे राहणाऱ्या तरुणीचे नाव शबाना खातून आहे. शबानाने सांगितले की, ती गेल्या ४ वर्षापासून अभिषेकला ओळखत होती. दोघामध्ये आधी मैत्रिपुर्ण संबध होते. त्यानंतर काही दिवसांनी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान त्यांनी कुटुंबीयांनाही याबाबत माहिती दिली.
 
मैत्री, प्रेम आणि लग्न करण्याची इच्छा व्यक्त करूनही अभिषेक हिंदू असल्यामुळे शबानाचे वडील नूर मोहम्मद यांनी या नात्याला विरोध केला. तसेच या जोडप्यांच्या भेटीवरही शबानाच्या वडीलांकडून बंदी घालण्यात आली आहे. मात्र अखेर प्रेमाखातर रमजान महिन्यात शबाना तिचा प्रियकर अभिषेकसोबत दिल्लीला राहायला गेली.

शबाना घरातून बाहेर पडताच तिच्या कुटुंबीयांनी अहियापूर पोलीस ठाण्यात अभिषेकसह ५ जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून शबानाचा शोध सुरू ठेवला आहे. दुसरीकडे शबाना आणि अभिषेकने दिल्लीत कोर्ट मॅरेज केले. शेवटी घरातून बाहेर पडल्यानंतर तब्बल ४२ दिवसांनी शबाना पती अभिषेकसोबत मुजफ्फरपूरला पोहोचली आणि पोलीसांना शबानाने स्वतः प्रौढ असल्याचा पुरावा दिला. पोलिसांनी शबानाचा जबाब न्यायालयात नोंदवला.

तसेच शबानाने तिच्या जीवाला, तिच्या पतीला आणि तिच्या कुटुंबीयांच्या जीवाला असलेला धोका सांगितला आणि पोलिसांकडून संरक्षणाची मागणीही केली. मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे डेप्युटी एसपी राघव दयाल यांनी सांगितले की, शबाना प्रौढ असून तिने स्वत:च्या इच्छेने कोर्ट मॅरेज केले आहे. डीएसपीच्या म्हणण्यानुसार, मुलीने पोलिसांना दिलेल्या तिच्या १६१ क्रमांकाच्या बयाणात अभिषेकशी स्वतःच्या इच्छेने लग्न करण्याची आणि त्याच्यासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.