आनंदाची बातमी ; मुंबईत लवकरच 'वंदे मेट्रो लोकल'धावणार

    20-May-2023
Total Views |
mumbai-local-vande-train-railway
 
मुंबई : मुंबईरांचा लोकल प्रवास आरामदायी करण्यासाठी आता मुंबईत वंदे भारतच्या धर्तीवर वंदे मेट्रो सुरू करण्यात येणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी प्रकल्पातंर्गत २३८ वंदे मेट्रो (उपनगरी) बांधणीला रेल्वे मंडळाने दि. १९ मे रोजी मंजूरी दिली आहे. याबाबतचे पत्र रेल्वे मंडळाने मुंबई रेल्वे विकास महामंडळाला पाठवले. १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे मेट्रोची संकल्पनांना जाहीर केली होती. त्यामुळे आता लवकरच मुंबईत वंदे मेट्रो धावणार आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.