इटलीत अनेक शहरांना पुराचा फटका ; १३ जणांचा मृत्यू!

    20-May-2023
Total Views |
floods-in-italy-kill-13-people

नवी दिल्ली:
उत्तर इटलीला पुराचा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे अनेक भागात नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. मुसळधार पावसामुळे उत्तर इटलीतील नद्यांना वेग आला आणि पुराचे पाणी शहारांमध्ये साचलेले आहे. यामुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पुरामुळे आतापर्यत १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हजारो लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. पुरामुळे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या पुरामुळे शेतीचे विशेष नुकसान झाल्याचे सांगितले जाते.
 
या पुरामुळे ५ हजार एकरपेक्षा जास्त पीक पुराच्या पाण्याखाली बुडाली आहेत. मुसळधार पावसामुळे एमिलिया रोमाग्ना प्रदेशात ३०० हून अधिक ठिकाणी भूस्खलन झाले.सुमारे २३ नद्यांना पुर आलेला आहे. पुरामुळे सुमारे ४०० रस्त्यांचे नुकसान झाले असून १०००० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. दुसरीकडे पुरामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे २७,००० लोक अजूनही अंधारात आहेत.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.