५०० आणि १००० च्या नोटांचं नेमकं काय झालं?

20 May 2023 16:08:17
 
500 and 1000 notes
 
 
मुंबई : नोटबंदीनंतर बंद झालेल्या 500 आणि 1000 च्या नोटांचं नेमकं काय झालं? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अहमदाबादच्या नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (NID) च्या विद्यार्थ्यांनी मागील आठवड्यात एका विशेष प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं. ज्यात रद्द झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांपासून अनोख्या वस्तू बनवण्यात आल्या होत्या. या नोटांपासून साऊंड प्रूफ टाइल्स, पर्स, विटा, डायरी इत्यादी वस्तू बनवल्या गेल्या होत्या.
 

500 and 1000 notes 
 
 
NID आणि नेदरलँडमधल्या 'रॉयल डच कस्टर्स इंजिनिअरिंग' या संस्थेनं एकत्र येत 'वॅल्यू फॉर मनी' या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेसाठी वाया गेलेल्या किंवा खराब झालेल्या नोटांपासून विविध वस्तू बनवायच्या होत्या. या स्पर्धेसाठी ५०० आणि १००० च्या नोटांपासून या वस्तू बनवण्यात आल्या. ४९ विविध संस्थांमधील १८४ विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. या विद्यार्थ्यांना आरबीआयनं बंद झालेल्या नोटा वस्तू बनवण्यासाठी देण्यात आल्या होत्या.
 
 
 
500 and 1000 notes
 
NID च्या कँपसमध्ये भरलेल्या या प्रदर्शनात जुन्या नोटांपासून बनलेल्या २२ अनोख्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. या नोटांपासून विद्यार्थ्यांनी साऊंड प्रूफ टाइल्स, पर्स, विटा, डायरी इत्यादी वस्तू बनवल्या आहेत. पहिल्या चार विजेत्यांना अनुक्रमे १ लाख, ७५ हजार, ५० हजार, २५ हजार अशी रोख पारितोषिकं देण्यात आलं. रद्द झालेल्या नोटांचा वापर जमिनीच्या भरावासाठी आणि तेल निर्मितीच्या कामात करण्यात आला आहे.
 
 
500 and 1000 notes
 
 
Powered By Sangraha 9.0