इतक्या मोठ्या अॅक्टरला मारहाण झाली, ऐकून वाईट वाटलं!

संजय शिरसाट यांची सुषमा अंधारेंवर टीका

    20-May-2023
Total Views |
 
Sushma Andhare
 
 
मुंबई : इतक्या मोठ्या अॅक्टरला मारहाण झाली, ऐकून वाईट वाटलं. अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे मारहाण प्रकरणावर दिली आहे. संजय शिरसाट यांनी खोचक शब्दांत अंधारेंवर टीका केली आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुषमा अंधारे पैसे मागतात, पदे विकत असून आपले पद देखील विकायला काढल्याने आपण त्यांना दोन चापट मारल्या असा दावा आप्पासाहेब जाधव यांनी केला.
 
संजय शिरसाट यांनी अंधारे यांचा उल्लेख ‘ऍक्टर’ असा केला आहे. "इतक्या मोठ्या ऍक्टरवर मारहाण झाली मला वाईट वाटतं.एखाद्या महिलेवर हात टाकण्यापर्यंत मजल जाते म्हणजे तेव्हा त्या महिलेने मर्यादा सोडलेली असते.ज्या सुषमा अंधारे यांनी बाळासाहबे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली त्यांनाच उद्धव ठाकरे यांनी पक्षात घेतलं. महिलेवर हात उचलणं हे चुकीचं आहे, पण महिलेने पण मर्यादा सांभाळली पाहिजे.उद्धव ठाकरे यांनी आता तरी डोळे उघडले पाहिजे. सुषमा अंधारे आणि संजय राऊत हे शिवसेना डुबवल्याशिवाय राहणार नाही." अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.