सत्तेसाठी इतके लाचार लोक पाहिले नाही : संजय शिरसाट

    20-May-2023
Total Views |
Sanjay Shirsat on Uddhav Thackeray

मुंबई
: शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आमचा चेहरा शिवसेना प्रमुख व मोदी हे आहेत.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचे शिवसेनाप्रमुखांचे विचार कधीही सत्तेसाठी इतके लाचार लोक मी पाहिले नव्हते,असे शिरसाट म्हणाले.कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही . लोकसभेत ४५ जागा जिंकण्याचे आमचे टार्गेट आहे, असे ही शिरसाट म्हणाले.

तसेच येत्या निवडणुकीत ठाकरे गट महाराष्ट्रात शोधून ही सापडणार नाही. त्यामुळे मोदी आणि बाळासाहेब ठाकरेंचा चेहरा घेऊन मत मागणार असल्याचे ही शिरसाट म्हणाले. त्याचबरोबर जे गद्दार आहेत त्यांनी आम्हाला गद्दारी शिकवू नये.कारण जनतेच्या मताशी गद्दारी ठाकरे गटाने केली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत कुठे ही गेलात तरी तुम्हाला यश येणार नाही, असे शिरसाट म्हणाले.