'...तर जगातून मनुष्याचे अस्तित्व संपेल'

20 May 2023 16:42:53
sam altman

अमेरिका
: कृत्रिम बुध्दिमत्तेमुळे मानवाच्या अस्तित्वाला धोका पोहोचण्याची भीती चॅट जीपीटीचे जनक सॅम ऑल्टरमन यांनी व्यक्त केली आहे. ते अमेरिकन संसदीय समितीसमोर ते बोलत होते. तंत्रज्ञान कंपन्या कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर करत असून त्यामुळे मानवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत, असा दावा त्यांनी यावेळी केला. तसेच प्रोग्रामरने चुकून जर सुपर इंटेलिजन्स तयार केले तर ते मनुष्याचे अस्तित्वच संपवू शकते, असा दावा चॅट जीपीटीचे जनक सॅम ऑल्टरमन यांनी केला आहे.

दरम्यान, आयओएस वापरकर्त्यासाठी आता चॅट जीपीटी अॅप येणार आहे, अशा बातम्या माध्यमांवर पाहायला मिळत आहे. चॅट जीपीटी अॅपमुळे आयओएस वापरकर्त्यांना त्यांचा फायदा घेता येणार आहे. चॅट जीपीटीचा वापर अॅपल फोन व टॅब धारक यांना करता येणार आहे.


Powered By Sangraha 9.0