मुख्यमंत्र्यांची भेट घेत नाना पाटेकरांनी केली 'या' विषयावर चर्चा!

    20-May-2023
Total Views |
Nana Patekar meeting Eknath Shinde


मुंबई
: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. यावेळी पाटेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ आणि गणरायाची मूर्ती देऊन त्यांचे स्वागत केले. या भेटीमध्ये राज्य सरकारची सुरू असलेली विविध विकासकामे, नाम फाउंडेशनचे सध्या सुरू असलेले काम ,राज्यात सिंचन आणि जलसंधारण कामांची गरज अशा अनेक विषयांवर दिलखुलासपणे चर्चा झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत या भेटीची माहिती दिली.