घराच्या उत्खननात सापडला मुघलांचा खजिना!

20 May 2023 19:00:33
 
Mughal treasure
 
 
उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात एका घराच्या उत्खननादरम्यान मुघलकालीन खजिना सापडल्याचा दावा केला जात आहे. तिजोरीत धातूच्या विटा आणि नाणी असल्याचे समजते आहे. खोदकाम करणारा मजूर सोन्याची वीट घेऊन पळून गेल्याचा दावाही केला जात आहे.
 
उत्खनन होत असलेल्या घराच्या शेजारी राहणाऱ्या विनीत गुप्ता यांच्या दाव्यानंतर गुरुवारी १८ मे २०२३ रोजी ही बाब समोर आली. मात्र, २ आणि ५ पैशांची नाणी सापडल्याचे घरमालक महादेव विश्नोई यांचे म्हणणे आहे. वीट मिळाल्याची बाबही त्यांनी मान्य केली आहे. पोलिसांनी सापडलेला माल ताब्यात घेतला असून पुढील कारवाई सुरू आहे.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण औरैया जिल्ह्यातील कोतवाली नगर भागाशी संबंधित आहे. येथील मुमती मोहल परिसरात एका घरात बांधकाम सुरू होते. यादरम्यान जुने बांधकाम पाडताना मजुरांना गाडलेला खजिना सापडला. या खजिन्यात धातूच्या विटा आणि काही नाणी असल्याचे सांगितले जात आहे. काही वेळातच गोंधळ सुरू झाला. आजूबाजूला लोक जमल्याचे पाहून एक मजूर घटनास्थळावरून वीट घेऊन पळून गेला. ही वीट सोन्याची असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0