‘म्हाडा’ सोडत २०२३; मुंबईतील ४०८३ घरांच्या सोडतीची जाहिरात सोमवारी

20 May 2023 12:57:59
Mhada

मुंबई :
‘म्हाडा’च्या मुंबई मंडळामार्फत काढण्यात येणार्‍या ४ हजार, ८३ घरांसाठी सोमवार, दि. २२ मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ‘म्हाडा’ची ही घरे दादर, अ‍ॅन्टॉप हिल, शीव, परळ, मुंबई सेंट्रल, गोरेगाव, विक्रोळी, जुहू, अंधेरी आदी भागातील आहेत. सोमवार, दि. २२ मेपासून नोंदणी, अर्जविक्री व स्विकृती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. दि. १८ जुलै रोजी वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे. पहाडी गोरेगाव येथील ‘पंतप्रधान आवास योजने’त अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३०५ चौ.फुटांची १ हजार, ४७ घरे असून त्यांची किंमत ३३ लाख, ४४ हजार एवढी असून ‘आर आर बोर्डा’कडून प्राप्त घरांची किंमत एक कोटी ते सात कोटी रुपयांपर्यंत असणार आहे. अल्प गटासाठी १ हजार, २२ तर, मध्यम गटासाठी १३२ आणि उच्च गटासाठी ३९ घरे उपलब्ध करून दिली आहेत.
 
Powered By Sangraha 9.0