जातीय समीकरणे जुळवण्यात काँग्रेसला यश! मंत्रिमंडळ शपथविधी संपन्न

    20-May-2023
Total Views |
Karnataka Cabinet

बेंगलुरु : कर्नाटकातील विजयानंतर दि. २० मे रोजी कर्नाटकात काँग्रेसने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यासह ८ मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. यावेळी सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाची तर डी.के .शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच जी.परमेश्वर, के. जे जॉर्ज ,के एच मुनियप्पा,सतीश जारकीहोली,जमीर अहमद,रामलिंगा रेड्डी,प्रियांक खरगे, एमबी पाटील हे आमदार देखील मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

मंत्रिपद देऊन काँग्रेसने जातीय समीकरणे जुळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जी परमेश्वरा, प्रियांक खर्गे आणि केएच मुनियप्पा दलित समुदायातून आले आहेत. केजे जॉर्ज हे अल्पसंख्याक-ख्रिश्चन समाजातून, एमबी पाटील लिंगायत समाजातून, सतीश जारकीहोळी एसटी वाल्मिकी समाजातून, रामलिंगा रेड्डी रेड्डी समाजातून आणि जमीर अहमद खान हे अल्पसंख्याक मुस्लिम समाजातून आले आहेत.मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे सिद्धरामय्या हे कुरुबा समाजाचे असून उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे वोक्कलिगा समाजाचे आहेत.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.