इंस्टाग्राम करू शकते ट्विटरसारखे अॅप लाँच

    20-May-2023
Total Views |
instagram

दिल्ली
: इंस्टाग्रामची पॅरेंट कंपनी असलेली मेटा लवकरच एक नवीन अॅप लाँच करण्याच्या तयारीत आहे. मेटाने ट्विटरसारखे एक अॅप लाँच करण्याची तयारी केली आहे. या अॅपमध्ये ट्विटरसारखे नवीन फीचर्स असणार आहेत. फोटो, मजकूर, ट्विट शेअर लिंक्स त्याचबरोबर व्हिडीओ यासारखे फीचर्स आपल्याला या इंस्टाग्रामच्या नव्या ट्विटरमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जून महिन्यात हे अॅप लाँच करण्यात येणार असल्याचे मेटा या कंपनीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, अॅपवर काम सुरू आहे त्याचबरोबर हे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे इंस्टाग्रामचे नवे ट्विटरसारखे अॅप नेमके कसे असणार आहे याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.