केंद्रीय गृहमंत्र्यांनी चिंतन शिबीरात घेतला ‘व्हिजन २०४७’ चा आढावा

    20-May-2023
Total Views |
amit shah

नवी दिल्ली
: केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे शुक्रवारी गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या चिंतन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘व्हिजन २०४७’ च्या अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करणे हा ‘चिंतन शिबिर’चा उद्देश होता.

या शिबीरात केंद्रीय गृहमंत्र्यांनी दहशतवाद आणि कट्टरतावाद, अंतर्गत सुरक्षा, सायबर आणि माहिती सुरक्षा, अंमली पदार्थ, आपत्ती व्यवस्थापन आणि परदेशी यांच्याशी संबंधित विविध मुद्द्यांचा आढावा घेतला. त्यांनी आत्मनिर्भर भारत, विविध अर्थसंकल्पीय घोषणा आणि एमएचएच्या महत्त्वाच्या प्रलंबित मुद्द्यांचा आढावा घेतला. मंत्रालयाशी संबंधित विविध मुद्द्यांवर अधिकाऱ्यांनीही आपल्या सूचना मांडल्या.

चिंतन शिबिराच्या समोराप संबोधनात केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगात भारताचे स्थान झपाट्याने वाढत आहे आणि जगातील प्रत्येक क्षेत्रात प्रथम येण्यापासून कोणतीही गोष्ट रोखू शकत नाही. श्री अमित शाह म्हणाले की, गृह मंत्रालयाने व्हिजन २०४७ चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक रोडमॅप तयार केला पाहिजे आणि त्याचे अनुसरण केले पाहिजे आणि हा २५ वर्षांचा रोडमॅप भारताला जगात प्रथम बनविण्यात नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भविष्याची आव्हाने ओळखा

भविष्यातील आव्हाने ओळखून त्यावर उपाय शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. ड्रोन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि गैरवापर रोखण्याची क्षमता आणखी वाढवण्याविण्याची गरज आहे, असेही मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.