मुजफ्फरपूरमध्ये भीषण अपघात, घराला लागलेल्या आगीत ४ मुलींचा होरपळून मृत्यू!

    02-May-2023
Total Views |
Muzaffarpur Fire News

पटना : बिहारमधील मुजफ्फरपुर जिल्ह्यातील रामदयाळू रेल्वे स्थानकाजवळील एका झोपडपट्टीला दि.१ मे रोजी भीषण आग लागली. त्या आगीत तीन ते १२ तीन ते १२ वर्षे वयोगटातील एका कुटुंबातील चार मुलींचा होरपळून मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले.

सीओ सुधांशू शेखर यांनी सांगितले की,ही घटना रामदयाळू रेल्वे स्टेशनजवळील झोपडपट्टीत घडली. रात्री १०.३० च्या सुमारास घडली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती देण्यात आली आणि अग्निशमन दलाच्या मदतीने काही वेळाने आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत नरेश राम यांच्या चार मुलींचा अपघातात मृत्यू झाला. इतर सात जण भाजले असून त्यांना जिल्ह्यातील श्रीकृष्ण वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नसून संबंधित अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.तसेच चार मृतांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत देण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.


Muzaffarpur Fire News


सोनी कुमारी (१५), अमृता कुमारी (१२), कविता कुमारी (८) आणि नरेश राम यांची मुलगी शिवानी कुमारी (६) अशी मृतांची नावे आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. स्थानिक लोकांनी सांगितले की, घरातून बाहेर पडतानाच आग लागली होती, त्यामुळे लोक लवकर बाहेर पडू शकत नव्हते.