२ हजारांचा नोटांसंदर्भात मोठा निर्णय! या मुदतीपूर्वी बँकेत जमा करा!

    19-May-2023
Total Views |
rbi

मुंबई : भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून परत घेतल्या आहेत. त्याचवेळी या नोटा कायदेशीर निविदा म्हणून कायम राहणार आहेत. बँकांनी २ हजार रुपयांच्या नोटा जारी करू नये, असेही निर्देशही आरबीआयने दिले आहेत.

आरबीआयने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, भारतीय चलनातून २ हजार रुपयांच्या नोटा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचवेळी या नोटा कायदेशीर निविदा म्हणून कायम राहणार आहेत. नागरिक त्यांच्याकडील नोटा आपल्या बँक खात्यात जमा करू शकतात किंवा कोणत्याही बँकेच्या शाखेत इतर मूल्यांच्या नोटांमध्ये बदलू शकतात. बँक खात्यांमध्ये जमा करणे नेहमीच्या पद्धतीने केले जाऊ शकते. कामकाजाची सोय सुनिश्चित करण्यासाठी आणि बँक शाखांच्या नियमित कामकाजात व्यत्यय येऊ नये म्हणून, २३ मे २०२३ पासून कोणत्याही बँकेत २ हजार रुपयांच्या नोटांना अन्य मूल्यवर्गाच्या नोटांमध्ये एकावेळी २० हजार रुपयांपर्यंतच्या मर्यादेत बदलता येणार आहे. त्यासाठी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंतची मुदत देण्यात आली असून त्यासाठी बँकांना मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

परिपत्रकात म्हटले आहे की, आरबीआय कायदा १९३४ च्या कलम २४ (१) अंतर्गत नोव्हेंबर २०१६ साली ५०० आणि १००० रुपयांच्या बॅंक नोटांची कायदेशीर निविदा स्थिती काढून घेतल्यानंतर अर्थव्यवस्थेच्या चलनाची गरज जलदगतीने पूर्ण करण्यासाठी त्या वेळी चलनात २ हजार रुपयांची नोट आणण्यात आली होती. त्यानंतर इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर २ हजार रुपयांच्या नोटेचे उद्द्टिष्ट पूर्ण होऊन २०१८ – १९ साली या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती.

भारतीय रिझर्व्ह बँकेंने नोटांच्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. दोन हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. तसेच दोन हजाराच्या नोटा ३० सप्टेंबरपूर्वी बँकेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरबीआयच्या निर्णयामुळे दोन हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. दरम्यान, २०१६ साली झालेल्या नोटाबंदीनंतर २ हजाराच्या नोटा चलनात आल्या होत्या. आणि आता आरबीआयने हा २ हजारांच्या नोटांची  छपाई बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.