जसा पक्षप्रमुख तसे नेते, अंधारेंची यात काही चूक नाही!

- आ. नितेश राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

    19-May-2023
Total Views |
 
Nitesh Rane
 
 
मुंबई : जसा पक्षप्रमुख तसे नेते, सुषमा अंधारेंची यात काही चूक नाही. असं म्हणत आ. नितेश राणे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. बीडचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या दादागिरी करतात म्हणून त्यांना दोन कानशिलात लगावल्याचा दावा केला. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. यावर नितेश राणेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
 
राणे म्हणाले, "माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बुकींग, खंडणी यांसारखे अनेक आरोप झाले आहेत. काल, गुरुवारी बीडमध्ये जे सुषमा अंधारेंसोबत घडलं ते व्हायला नाही पाहिजे होतं. कोणत्याही महिलेला मारहाण करणं हे चुकीचं आहे. वारंवार होत असलेल्या आरोपांबाबत तथ्य तपासावे. सुषमा अंधारे आमच्यावर कोणत्याही भाषेत बोलल्या तरी त्या एक महिला म्हणून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमच्यावर आहे."
 
"जिल्हाप्रमुखांनी जे आरोप केले ते गंभीर आहेत. जिल्हाप्रमुख पद विकायला काढलं आहे. ऑफिसमधल्या एसीसाठीही पैसे मागितले. जेव्हा नारायण राणेंनी शिवसेना सोडली तेव्हाही त्यांनी उद्धव ठाकरेंवर हाच आरोप केला होता. आमदारकी, शाखाप्रमुख ही पदं विकली जात होती आणि आताही तोच आरोप होत आहे, त्यामुळे या आरोपांमध्ये तथ्य आहे. कारण जसा पक्षप्रमुख तसे त्यांचे नेते. ठाकरेही पद विकत देतात. त्यामुळे अंधारे जे करत आहेत त्यात त्यांची काही चूक नाही."
 
"उद्धव ठाकरे लॉंड्रीचा खर्चही करत नाहीत. ते ही लीला लॉंड्रीत जातात. तसंच, पटेल नावांचा व्यक्ती यांच्या गाड्यांची सर्व्हिसींग करतो. उद्धव ठाकरेंचा सर्व खर्च अनेक लोकं करतात. इतकचं काय सामनाचा साधा संपादकही विमानातून फर्स्ट क्लासमधून प्रवास करतो. आदित्य ठाकरेंची गाडी मराठवाड्याच्या एका व्यक्तीच्या नावावर आहे. मातोश्रीवर एसी कोणत्या कंपनीच्या आहेत? हे तपासावे." असा गौप्यस्फोट यावेळी नितेश राणेंनी केला.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.