खिशातच मोबाईलचा स्फोट! व्हीडिओ कॅमेऱ्यात कैद!

    19-May-2023
Total Views |
 
phone blast
 
 
केरळ : त्रिशूर मध्ये मारोतीचल भागात गुरुवारी सकाळी एका ७६वर्षीय व्यक्तीच्या खिशात ठेवलेला मोबाईल फोन मध्ये स्फोट झाला, अणि त्याला आग लागली. सदर व्यक्ती एका दुकानात चहा पीत असताना ही घटना घडली. सुदैवाने वृद्ध व्यक्तीस काही झाले नाही. या दुर्घटनेतून तो थोडक्यात बचावला.
 
औल्लूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळतातच त्यांनी वृद्धाला फोन करून माहिती विचारली. वृद्धाने सांगितल्याप्रमाणे त्याने हा फोन एक वर्षांपूर्वी 1000 रुपयांना विकत घेतला होता. या फोन मध्ये कोणतीही समस्या नव्हती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून काही टीव्ही चॅनल मध्ये ही घटना दाखवण्यात आली आहे. अचानक घडलेल्या घटनेमुळे वृद्धला धक्का पोहोचला आणि त्याने तातडीने शर्टच्या खिशातील फोन फेकून देत आपला जीव वाचवला. दुकानातही इतर व्यक्ती फोन वर पाणी टायकून आगीवर नियंत्रण मिळवत आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.