नाशिक : पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन व विवेक व्यासपीठ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्वा. वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित नाशिक आणि भगूर येथे वीरभूमी परिक्रमा व विचार जागरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वा. सावरकर यांच्या थोर राष्ट्रभक्तीच्या कार्यकर्तृत्वाने पावन झालेल्या नाशिक व जन्मस्थान भगूरच्या पवित्र भूमीत दि. २१ ते २८ मे २०२३ या कालावधीत स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताह साजरा होत आहे. स्वा. वि. दा. सावरकर यांचे नाशिक जिल्हा मध्ये भगूर येथे जन्मस्थान सावरकर वाडा व नाशिक येथील अभिनव भारत मंदिर आहे. या पवित्र स्थानाचे महात्म लक्षात घेता या ठिकाणी व नाशिक शहरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने नाशिक शहरात प्रसाद गोखले यांच्या ‘जयोस्तुते: स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव गीतांचा कार्यक्रम‘, चित्रकला स्पर्धा, ‘शब्दप्रभू सावरकर’, ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा, ‘माझी जन्मठेप’ अभिवाचनाचा रंगमंचीय अविष्कार, एकपात्री नाट्यप्रयोग ‘त्या तिघी स्वातंत्र्य कुंडातील अज्ञात समिधा’, ‘कृतज्ञ मी, कृतार्थ मी’ हे नाटक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘अनादी मी, अनंत मी’ गीतावर कथ्थक नृत्यांचा अविष्कार, राष्ट्रीय किर्तनकार हभप चारुदत्त आफळे महाराज यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवर कीर्तन, पदयात्रा, वेशभूषा स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे.
राष्ट्रीय विचारधारेतील नाशिकसह भगूर मधील अनेक सामाजिक संस्थांनी या कार्यक्रमात सहभाग असणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक मंगेश खाडिलकर, प्रदीप निकम, प्रसाद धोपावकर यांनी केले आहे.
कार्यक्रमांची रुपरेखा पुढीलप्रमाणे :-
रविवार, २१ मे : ‘जयोस्तुते’ स्वा. सावरकर गौरव गीत कार्यक्रम
वेळ ६ वा. छ. शिवाजी महाराज चौक, भगूर.
सोमवार २२ मे : चित्रकला स्पर्धा(संपर्क : (८३७८९९७१३८)
मंगळवार २३ मे : शब्दप्रभू सावरकर
वेळ : सायं ६:३०, श्री शंकराचार्य न्यास, गंगापूर रोड, नाशिक. ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
बुधवार, २४ मे : ‘माजी जन्मठेप’ अभिवाचनाचा रंगमंचीय अविष्कार, वेळ सायं:६ वा. प. सा. नाट्यगृह, नाशिक
गुरूवार, २५ मे : ‘त्या तिघी-स्वातंत्र्य कुंडातील अज्ञात समिधा’ एकपात्री नाट्यप्रयोग, वेळ सायं ६ वा. श्री शंकराचार्य न्यास, गंगापूर रोड, नाशिक.
शुक्रवार, २६ मे : ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’
वेळ : सायं ६ वा. प. सा. नाट्यगृह, नाशिक.
शनिवार, दि. २७ मे : ’अनादी मी अनंत मी’ स्वा. सावरकर यांच्या गीतांवर कथ्थक नृत्याविष्कार
सायं :७ वा. स्वा. सावरकर स्मारक, छ. संभाजीनगर नाका अपोलो हॉस्पिटल जवळ, पंचवटी, नाशिक.
रविवार, दि. २८ मे : स्वा. सावरकरांच्या विचारांवर कीर्तन, सायं ६ वा. धामणकर हॉल, पुरुषोत्तम हायस्कूल, जेलरोड, नाशिक