मोठी बातमी! दीड लाख नोकऱ्या मिळणार! अॅमेझॉन करणार मोठी गुंतवणूक!

19 May 2023 14:30:18
 
Amazon
 
 
मुंबई : अ‍ॅमेझॉनने मोठी घोषणा केली आहे. अ‍ॅमेझॉन भारतातील मोठी गुंतवणूक करणार आहे. यामुळे दरवर्षी १.३२ लाख नोकऱ्या निर्माण होतील. Amazon Web Services (AWS) २०३० पर्यंत भारतात क्लाउड संबंधित पायाभूत सुविधांमध्ये १,०५,६०० कोटी (१२.७ अब्ज डॉलर) गुंतवणूक करणार आहे.
 
मॅन्युफॅक्चरींग, इंजिनिअरींग, दूरसंचार क्षेत्रात प्रामुख्याने नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. कंपनी नव्या गुंतवणुकीसह प्रामुख्याने इंफ्रास्ट्रक्चरचा पाया आणखी मजबूत करणार आहे. अमेझॉन कंपनीने सन २०१६ ते २०२२ या ६ वर्षांच्या कालावधीत भारतात मोठी गुंतवणूक केली आहे. तब्बल ३.७ अब्ज डॉलर म्हणजेच ३०,९०० कोटी रुपयांची गुंतवणूक आत्तापर्यंत कंपनीने केली आहे. मात्र, आता लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून मोठी आर्थिक उलाढाल कंपनी भारतात करत आहे.
 
भारतात क्लाऊड संबंधित इन्फ्रास्ट्रक्चरची मागणी पाहता ही गुंतवणूक करण्यात येत आहे. डाटा सेंटर इंफ्रास्ट्रक्चरच्या गुंतवणुकीतून भारतीय व्यापारात दरवर्षी सरासरी १,३१,७०० नोकऱ्यांच्या संधी निर्माण होण्याचा अंदाज आहे. या नव्या गुंतवणुकीसह अमेझॉन कंपनीची भारतातील गुंतवणूक ही १,३६,५०० (१६.४ अब्ज डॉलर) पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. कंपनीचे भारतात २ डाटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर आहेत. पहिल्याच वर्षी २०१६ मध्ये मुंबईत एक सुरू करण्यात आले होते, तर दुसरे डाटा सेंटर नोव्हेंबर २०२२ मध्ये हैदराबाद येथे सुरू करण्यात आलं आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0