धक्कादायक! "AI"मुळे ५५ हजार नोकऱ्या गेल्या!

19 May 2023 15:15:04

jobs
 
 
मुंबई : जागतिक कंपन्यांकडून कर्मचारी कपातीचा सपाटा सुरूच आहे. आयटी कंपन्यांमधील मंदी आता दूरसंचार कंपन्यांपर्यंतही पोहोचली आहे. ब्रिटनमधील सर्वात मोठ्या ब्रॉडबँड आणि मोबाईल प्रदाता BT ग्रुपने ५५ हजार कर्मचाऱ्यांची कपात घोषित केली आहे. याआधी या कंपनीशी स्पर्धा करणाऱ्या व्होडाफोननेही मंगळवारी १० हजार कर्मचाऱ्यांना काढण्याची घोषणा केली.
 
BT ग्रुपने ४० टक्क्यांहुन अधिक कर्मचारी कपात करण्याचे कारण AI हे आहे. कंपनीतील 40 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा करताना ब्रिटनमधील सर्वात मोठा ब्रॉडबँड आणि मोबाइल प्रदाता समूह बीटी ग्रुपने गुरुवारी सांगितले की कंपनी 2030 पर्यंत 55,000 नोकऱ्या कमी करेल. बीटी ग्रुपमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या सध्या 130,000 आहे. समूहाने म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2030 च्या अखेरीस या कर्मचाऱ्यांची संख्या 75,000 ते 90,000 पर्यंत कमी होईल.
 
कंपनीचे बॉस फिलिप जॉन्सन यांच्या देखरेखीखाली कंपनी राष्ट्रीय फायबर नेटवर्क तयार करण्यावर काम करत आहे आणि त्याच वेळी ती हाय-स्पीड 5G मोबाइल सेवा देखील आणत आहे. जॉन्सन म्हणाले की डिजिटल नेटवर्क चालविण्यासाठी सुमारे 10,000 नेटवर्क अभियंत्यांची गरज कमी होईल, तर ऑटोमेशन आणि AI सारख्या तंत्रज्ञानामुळे सुमारे 10,000 कर्मचाऱ्यांची गरज कमी होईल.
 
 
Powered By Sangraha 9.0