केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये खातेपालट

18 May 2023 18:05:51
Union cabinet reshuffle

नवी दिल्ली
: केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये गुरुवारी खातेपालट करण्यात आला असून किरेन रिजिजू आणि एसपी सिंह बघेल यांच्याकडील खाती बदलण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनातर्फे त्याविषयीचे प्रसिद्धी परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

केंद्रीय कायदा मंत्री पदाची जबाबदारी किरेन रिजिजू यांच्याकडून काढून घेण्यात आली आहे. रिजिजू यांच्याकडे आता पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विद्यमान संसदीय कामकाज आणि सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे रिजिजू यांच्याकडील कायदा मंत्रीपदाचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे केंद्रीय कायदा राज्यमंत्री असणारे एसपी सिंह बघेल यांच्याकडेही आता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.दरम्यान, केंद्रीय पृथ्वीविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी नव्या जबाबदारीविषयी केंद्रीय मंरी मेघवाल यांचे अभिनंदन केले आहे. त्याचप्रमाणे कायदा मंत्रीपदाचा स्वतंत्र प्रभार अर्जुन राम मेघवाल यांनी स्विकारला आहे.


Powered By Sangraha 9.0