तुळजाभवानी मंदिर प्रवेशासाठी ड्रेसकोडची नियमावली

18 May 2023 18:24:56
tuljaour

मुंबई
: महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला जाणाऱ्या भक्तांसाठी एक नियमावली बनवण्यात आली आहे. मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वस्त्राबाबत प्रशासनाने निर्णय घेतला असून असभ्य आणि अशोभनीय वस्त्रे परिधान करून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश करता येणार नाही, या आशयाचा फलक मंदिर परिसरात गुरुवारी लावण्यात आला आहे. त्यामुळे आता मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्र आणि देशभरातून येणाऱ्या भक्तांसाठी नवी ड्रेसकोडची नियमावली करण्यात आली असून त्याचे पालन भाविकांना करावे लागणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनी जर बरमोडा, हाफ पॅन्ट, उत्तेजक कपडे तसेच अंग प्रदर्शन करणारे कपडे घातले असतील तर त्यांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही, असे फलकावर स्पष्टपणे लिहिण्यात आले आहे.

महिला अन पुरुषांसाठी वेगळी नियमावली

मंदिराच्या परिसरात महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पँट घालून मंदिरात प्रवेश करता येणार नाही. तसेच पुरुषांनाही शॉर्ट पॅन्ट, बर्मुडा, हाफ पॅण्ट यासारखे कपडे मंदिरात प्रवेश करताना घालण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाने कपड्यांच्या बाबतीत नियमांची आखणी केली असून त्याचे पालन महिला अन पुरुषांना करावे लागणार आहे.
Powered By Sangraha 9.0