पश्चिम बंगालमध्ये पुन्हा झळकणार ‘द केरला स्टोरी’

18 May 2023 18:55:20
supreme court

नवी दिल्ली
: ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याच्या पश्चिम बंगाल सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता प. बंगालमध्ये चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर प. बंगाल आणि तामिळनाडू राज्य सरकारने लादलेल्या बंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकादाखल करण्यात आली होती. याचिकवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्या. पी. एस. नरसिंह आणि न्या. जे. बी. पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने पंगाल सरकारच्या बंदीच्या आदेशास स्थगिती दिली आहे. तामिळनाडू राज्य सरकारला चित्रपटगृहांना सुरक्षा प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत.

न्यायालयाने म्हटले की, प. बंगाल सरकारने लादलेली बंदी ही योग्य कारणांवरून नसल्याचे न्यायालयाने प्रथमदर्शनी मत आहे. त्यामुळे चित्रपटावर बंदी घालण्याच्या आदेशा स्थगिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे न्यायालयाने तामिळनाडू सरकारलाही निर्देश दिले आहेत. राज्यातील सिनेमागृहांना पुरेशी सुरक्षा पुरविण्यात यावी आणि चित्रपट पाहणाऱ्यांची सुरक्षादेखील सुनिश्चित करण्यासोबतच पुन्हा प्रदर्शन रोखले जाणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, चित्रपटातील कथा काल्पनिक असल्याचे अस्वीकरण २० मे रोजीपर्यंत जोडण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.


Powered By Sangraha 9.0