‘कर्नाटकचा पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही, देशात फक्त मोदी पॅटर्न!’

18 May 2023 18:42:37
 
Devendra fadnavis
 
 
मुंबई : कर्नाटकचा पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही, देशात फक्त मोदी पॅटर्न चालणार. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच पुढील सत्ता आपलीच असेल असाही दावा त्यांनी यावेळी केला. पुण्यात गुरुवारी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारीणी बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं.
 
कर्नाटक निकालावर बोलताना फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला. ते म्हणाले, "महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार येणार आहे. कर्नाटकमधील भाजपच्या पराजयाची चर्चा होत आहे. मात्र, ज्यांची एक जागा निवडून आली नाही ते बडवत आहेत, ज्यांच्या घरी पोरगा झाला नाही ते देखील आनंद साजरा करत आहेत. मात्र राज्यात पुन्हा आपली सत्ता येणार आहे. महाराष्ट्र कर्नाटक पॅटर्न लागू करणार असं काहीजण सांगत आहेत. मात्र अल्पसंख्यांकाचे ध्रुवीकरण करुन महाराष्ट्र जिंकता येणार नाही." असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
 
महाराष्ट्रात एकच पॅटर्न चालेल मोदी पॅटर्न आणि भाजप पॅटर्न. भाजप आणि शिवसेनेची युती भक्कम असून आपला निवडून येण्याचा फॉर्म्युला मोदीजींची कार्यशैली, सामान्यांच्या विकासाचा आपला नरेटीव्ह आहे. असे फडणवीस यांनी सांगितले. 2023 चे शेवटचे सहा महिने आणि 2024 चे पहिले सहा महिने भाजपसाठी फार महत्वाचे आहेत. या दिवसात कोणतीही लालसा मनात न बाळगता भाजपसाठी द्यायचे आहेत. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक वर्ष फार महत्त्वाचं असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0