कुणी राजाला जाऊन सांगा त्यांचा पोपट मेलायं!

देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

    18-May-2023
Total Views |
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray

मुंबई
: उद्धवजींना कुणातरी सांगा , पोपट मेला ,असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. १६ आमदारांच्या निर्णयावरून फडणवीसांनी हे टीकास्त्र ठाकरेंवर सोडले आहे.तसेच सरकार टिकणार आणि पुन्हा निवडून येणार , असे ही देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीस राजा आणि पोपटाची गोष्ट सांगत म्हणाले की, आमचे उद्धवजी राजे-महाराजांपेक्षा कमी नाहीयेत. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे. एका राजाला एक पोपट फार आवडत होता आणि पोपट मेला. आता प्रश्न असा आहे की, राजाला सांगेल कोण की पोपट मेला आहे?,असे ही फडणवीस म्हणाले. 
 
तसेच राजाचा जीव पोपटात आहेत त्याचप्रमाणे दुसरा पोपट मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत.त्यामुळे हा पोपट जिंकणार आणि टिकणार सुद्धा आहे, असे फडणवीस म्हणाले. भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मुंबई भेटीनिमित्ताने दि.१७ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी ही तुफान टोलेबाजी केली.