...तो सर्कशीतील वाघ असतो; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे, मविआवर घणाघात

18 May 2023 19:23:16
devendra fadanvis

पुणे
: गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात विश्वासघातचे सरकार होते. या सरकारचा विश्वासघातापासून विसर्जनापर्यंतचा प्रवास सर्वांनी पाहिला आहे. खंडणीखोरापासून दाऊतपर्यंतचा आणि पोलिसांचा बदल्यांमध्ये वसूलीचे काम जनतेने पाहिले. जे बनायचे ते स्वत:च्या भरवशावर बनायला हवे. दुसर्‍यांच्या बळावर बनता येत नाही. दुसर्‍याचे बळ घेऊन बनलेला वाघ हा सर्कशीतला वाघ असतो. स्वबळावर बनलेला वाघ हा जंगलाचा राजा होऊ शकतो अशा रोकड्या शद्बात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि मविआ सरकारवर आसूड ओढले.

पुण्यात पार पडलेल्या भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती बैठकीत ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, लोकसभेत २८ पैकी किमान २५ जागांवर निवडून येऊ. विरोधकांनी कर्नाटक फॉर्म्युला लागू करण्याच्या वल्गना सुरु केल्या आहेत. मात्र, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथे तुमची डाळ गळणार नाही. अल्पसंख्यांकांचं ध्रुवीकरण करून निवडून येणे शक्य नाही. महाराष्ट्रात शिवरायांनी तयार केलेला एकेक मावळा हे मनसुबे हाणून पाडेल. तुम्ही कितीही तुष्टीकरण करा, लांगूलचालन करा. तरीदेखील, कर्नाटक पॅटर्न इथे चालणार नाही. येथे फक्त मोदी पॅटर्न-बीजेपी पॅटर्न-छत्रपती शिवरायांचा पॅटर्नच चालेल असे आव्हानही त्यांनी दिले.

ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना गावोगावी जाऊन आपलाच विजय झाल्याचे सांगा असे म्हणत आहेत. या महाविकास आघाडीचा पोपट मेलाय. प्रश्न असा आहे की हे राजाला सांगायचं कोणी? गावोगावी जाऊन ढोल बडवा. काही हरकत नाही. तुम्ही आमच्याच आंदोलनात सामील होताय. भाजपा-शिवसेनेचे सरकार पूर्णपणे संवैधानिक आणि घटनात्मक आहे. कार्यकर्त्यांच्या मेहनतीने आणि आशीर्वादाने हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा निवडून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

२६/११ नाना पटोलेंनी केला काय?काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर करत अंबानी यांच्या निवासस्थानी जी स्फोटके सापडली होती, ती फडणवीसांनीच ठेवली होती, असा मोठा आरोप नाना पटोले यांनी केला होता. नाना पटोलेंच्या या आरोपाचा समाचार घेताना फडणवीसांनी खरमरीत प्रत्युत्तर दिलं आहे. २६/११ चा दहशतवादी हल्ला नाना पटोलेंनी केला असं स्टेटमेंट द्यावं का? अशी माझी इच्छा झाली आहे, असं ते म्हणाले.

Powered By Sangraha 9.0