महापौर भाजपचाच, फडणवीस-नड्डांनी केला निर्धार

18 May 2023 10:35:25
BMC BJP Mayor
 
मुंबई : मुंबई महापालिकेत भाजपाचाच महापौर बसणार , असा दावा भाजप अध्यक्ष जे .पी .नड्डा यांनी केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत त्यावेळी त्यांनी हा दावा केला. त्यांनी यावेळी महापालिका निवडणूक तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी चर्चा केली. भाजपने महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

मुंबई महापालिकेत ठाकरे गटाची सत्ता आहे. या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने देखील भाजप रणनीती आखत आहे. यावेळी नड्डांनी पदाधिकाऱ्यांना बजावेल आहे की, पुढील महापौर हा भाजपचाच असायला हवा. तसेच देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा महापौर हा भाजपाचाच असेल,असा दावा केला आहे.


Powered By Sangraha 9.0