पर्यावरण संवर्धनाचे कार्यतत्पर नेतृत्व

17 May 2023 22:18:47
neeta

विज्ञान शाखेची विद्यार्थिनी, उत्तम शिक्षिका ते आंतरराष्ट्रीय संस्थेत पर्यावरणासाठी कुशल नेतृत्व करणार्‍या, पर्यावरण संवर्धनाचे कृतिशील धडे देणार्‍या नीता गांगुली यांचा हा प्रवास...

गेल्या २० वर्षांपासून पर्यावरणासाठी सातत्याने कार्यरत नीता गांगुली यांचा जन्म मूळचा दिल्लीतला. बालपणापासून ‘दिल्ली की छोरी’ असलेल्या नीता राजधानीत मात्र फारशा कधी रमल्या नाहीत. महाराष्ट्र आणि प्रामुख्याने पुणे शहर हे त्यांच्या आवडीचे. जुळी बहीण नीपा, एक भाऊ आणि आई-वडील असे नीता यांचे सामान्य कुटुंब. आई आणि वडील दोघेही शिक्षकी पेशात असल्याने लहानपाणापासूनच त्यांना एक वेगळं वातावरण मिळालं. त्यांची आई ‘रसायनशास्त्रा’ची प्राध्यापिका, तर वडील ‘स्ट्रॅटेजी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’ या विभागात प्राध्यापक. आई-वडिलांच्या संस्कारांमुळे आणि शिकवणुकीमुळेच पर्यावरणाशी नीता यांची नाळ लहानपणापासूनच जोडली गेली. लहानपणी भेटकार्ड बनवताना जुन्या भेटकार्डांमध्येच फेरफार करून नवीन भेटकार्ड तयार करत असल्याचा किस्सा त्यांनी सांगितला. ज्यामुळे कागद वाचवण्याचे तसेच पुनर्वापराचे धडे त्यांच्या बालमनावर कोरले गेले. ‘बेस्ट आऊट ऑफ वेस्ट’ तसेच ‘रियुजिंग’ म्हणजेच वस्तूंचा पुनर्वापर या संकल्पना अभ्यासण्यापूर्वीच त्याची पाळेमुळे त्यांच्यात रुजली होती.

नीता यांनी शिक्षण, प्राणिशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. पुढे सैन्यातील अधिकार्‍याशी विवाहानंतर त्या वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकवत होत्या. वर्गातील फळा आणि खडूविना दिलेल्या शिक्षणावर अधिक विश्वास असणार्‍या नीता यांना फळ्याचा मात्र तिटकारा वाटतो. त्यामुळेच प्रयोगशील आणि विविध उपक्रम राबवत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यावर त्यांचा भर असायचा.दिल्लीतील संस्कृती शाळेत पर्यावरण विभागाच्या प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. या शाळेत नीता यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळेत विविध उपक्रम आणि प्रयोग राबवून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात होते. कोणत्याही प्रयोगशाळेत काम करायचे म्हणजे काहीतरी स्रोत आवश्यक असतात. या प्रयोगशाळेत कचरा हा विद्यार्थ्यांचा प्रमुख आणि एकमेव स्रोत होता. यात कचर्‍याची विभागणी करून लाल, हिरवे आणि निळे असे तीन डबे तयार करण्यात आले होते. लाल डब्यात पूर्ण सुका कचरा, हिरव्या डब्यात ओला कचरा आणि निळ्या डब्यात फक्त कागदाचा कचरा असे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया केली जात होती. विनापुस्तक आणि विनावही (लेखनसाहित्य) चालविली गेलेली ही प्रयोगशाळा म्हणजे ‘संवर्धन’ प्रकल्प आणि कचरा व्यवस्थापन केलेले मूर्तिमंत उदाहरण. पर्यावरण हा अनुभवण्याचा आणि प्रत्यक्ष कृती करून आत्मसात करण्याचा विषय आहे, लिहून-वाचून अभ्यासण्याचा विषय नाही, यावर गांगुली यांचा दृढ विश्वास आहे.

२० वर्षं त्या स्वतःच कंपोस्टिंग करत असल्यामुळे घरातला ओला कचरा बाहेर न जाता, त्यापासून खतनिर्मिती केली जाते. या कामामुळे या काळात कुठल्याही प्रकारचा ओला कचरा त्यांच्या घराच्या बाहेर गेला नसल्याचं त्या अभिमानाने सांगतात आणि त्यामुळेच ‘लॅण्डफिल्स’ असलेल्या परिसरात आग लागल्याच्या घटना ऐकिवात आल्या तरी यासाठी आपण निश्चितच जबाबदार नाही, याचं समाधान त्यांना असतं. पर्यावरणावर आधारित ‘झजङध ढठअझ’- २०१६ , ‘कशश्रश्रे एरीींहहशीश ुश लेाश’ - २०१७ , ३६५ थअधड ढज डअतए ढकए एछतखठजछचएछढ ळप २०२१ ही तीन पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्याचबरोबर ‘पर्यावरण’ या विषयावर त्यांनी ‘टेड-टॉक्स’वर ही मार्गदर्शन केले आहे. ऑक्टोबर २०१५ मध्ये ‘क्लायमेट प्रोजेक्ट फाऊंडेशन’च्यावतीने, नीता यांनी मालदीव सरकारसाठी ’ग्रीन स्कूल प्रोजेक्ट’ वरील ‘युनेस्को’च्या अहवालात योगदान दिले.

सामान्य माणसांमध्ये, मुलांमध्ये फिरून जनजागृती करणे, पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे हे सगळं कारायला त्यांना आवडते. कचर्‍याचे व्यवस्थापन कसे करावे, याविषयी देखील त्या मार्गदर्शन करतात. घरातील उरलेले जेवण बरेचदा आपण फ्रीजमध्ये ठेवतो आणि नंतर ते खातही नाही. त्याऐवजी ते खाद्य कुणा गरिबाला दिल, तर त्याचे पोटही भरेल आणि अन्नही वाया जाणार नाही, असा सल्ला नीता देतात. म्हणूनच घरात खाल्लेल्या प्रत्येक फळातील बी रुजवून तिचे रोपटेही त्या बनवतात. गेल्या २० वर्षांपेक्षा अधिक काळ कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणासाठी काम करणार्‍या नीता यांना त्यांच्या योगदानासाठी अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. २००४ मध्ये (शिक्षणातील उत्कृष्टतेसाठी सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार) ’इशीीं ढशरलहशीी रुरीव षेी एुलशश्रश्रशपलश ळप एर्वीलरींळेप, २०१० मध्ये ’इनोव्हेटिव्ह टीचिंग प्रॅक्टिसेस अवॉर्ड’, २००९ मध्ये र्ऋीश्रलीळसहीं ीलहेश्ररी, २०२१ मध्ये ‘आयईएसईसीसीआय’कडून अवाळीशव खपीळिीळपस खपवळरप उरीव’ असे राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देण्यात आले आहेत.

“आपल्या घरातील कचर्‍याचे स्वतः व्यवस्थापन करायला शिकलात, तरच खर्‍या अर्थाने पर्यावरणासाठी तुम्ही काहीतरी योगदान देऊ शकता,” असे त्या सांगतात. ‘युज अ‍ॅण्ड थ्रो’ ही आपली संस्कृती नाही, त्यामुळे हे सोडून आपल्या मूळ भारतीय संस्कृतीकडे परत जायला हवं, याविषयी त्या आग्रही आहेत. “मूळ भारतीय संस्कृतीकडे वळलो, तर आपण अधिक परिणामकारकतेने पर्यावरण संवर्धनासाठी काम करू शकू,” असे त्या सांगतात. या पर्यावरणीय कर्तृत्वाला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!
Powered By Sangraha 9.0