मुंबईतील तीसहजार सिमकार्ड बंद होणार!

17 May 2023 18:26:30
 
SIM card
 
 
मुंबई : मुंबईतील बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने बनवण्यात आलेले सुमारे तीस हजारांहूनही अधिक सिमकार्ड दूरसंचार विभागाकडून बंद करण्यात आल्याची माहिती दूरसंचार विभागाच्या मुंबई विभागाकडून देण्यात आली आहे.
 
दूरसंचार मुंबई विभागाकडून सर्व मोबाइल जोडण्याची तपासणी केली असता ६२ संघूहांमध्ये एकाच छायाचित्राचा वापर करून विविध नावाने मोबाईल कनेक्शन घेण्यात आल्याचे आढळून आले. एका समूहामध्ये केवळ ५० ग्राहक असण्याची मर्यादा असतानाही या ६२ समूहांमध्ये सुमारे ८,२४७ ग्राहक आढळल्याची माहिती दूरसंचार विभागाकडून देण्यात आली आहे.
 
दरम्यान एका प्रकरणात एकाच चेहऱ्याच्या व्यक्तीला तब्बल ६८४ विविध मोबाइल क्रमांक जारी करण्यात माहिती समोर आली आहे. दूरसंचार विभागाने बनावट सिम कार्डचे हे रॅकेट शोधून काढण्यासाठी ASTR – अस्त्र याचा वापर केला आहे. तंत्रज्ञानात कृत्रिम बुद्धिमत्ता AI आणि फेशियल रिकग्निशन पॉवर्ड सोल्यूशन म्हणजेच चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला दूरसंचार आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0